शाओमी चा फुल डिस्प्ले बजेट फोन लवकरच भारतात

इमेज
शाओमीचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत येणार आहे. हा 2018 मधील भारतीय बाजारपेठेतील शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल. शाओमी इंडिया 14 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे, ज्यासाठी त्यांनी प्रसार माध्यमांना निमंत्रण पाठविले आहे. निमंत्रणामध्ये मोठा '5' लोगो वापरला गेला आहे. लोगो वरून हे स्पष्ट आहे की शाओमी आपला रेडमी 5 हा बजेट स्मार्टफोन 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करणार आहे. तसेच या स्मार्टफोन बरोबर रेडमी 5 प्लस देखील प्रदर्शित केला जाऊ शकतो. रेडमी 5 हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम / 64 जीबी स्टोरेज अशा तीन प्रकारात येण्याची शक्यता आहे. हा फोन चीनी बाजारपेठेत  डिसेंबरमध्ये ब्लॅक, गोल्ड, लाईट ब्लू, आणि रोझ गोल्ड अशा चार रंगांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. शाओमी Redmi 5 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज ची किंमत 799 चीनी युआन (सुमारे रु 8,100), 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज ची किंमत 899 चीनी युआन (रुपये 9,100) 4 जीबी रॅम ची किंमत 10,900 चिनी युआन (सुमारे 11,200 रुपये) आहे. शाओमी Redmi 5 प्लस 3 जीबी रॅम / 32 जीब

शैक्षणिक क्षेत्रातील "महामेरू"


एकच माणूस डॉक्टर होता,
तो वकील ही होता,
तो आयपीएस अधिकारी होता,
तसंच आयएएस अधिकारीही होता.
याशिवाय तो पत्रकारही होता,
इतकच नाही तर कीर्तनकार,
आमदार,
खासदार आणि
मंत्रीही होता.
इतक्या पदव्या मिळणारा न्याययोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय.
श्रीकांत जिचकार यांच नांव आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
जिचकारांचा 2004 साली अपघाती मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आज कोर्टाने एसटी महामंडळाला जबाबदार धरलं आहे. तसंच जिचकार यांच्या कुटुंबियांना 50 लाख 67 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातील महामेरू म्हणून संबोधता येईल असं नाव म्हणजे श्रीकांत जिचकार होय. अवघ्या 49 वर्षातील जीवन, 42 विद्यापीठ, 20 पदव्या आणि 28 सुवर्णपदक असा ज्ञानाचा खजिना या अवलियाने  जिंकला.

आयएएस असो वा आयपीएस, एलएलएम असो वा एमबीबीएस देशातील बहुतेक सर्वच पदव्या मिळविण्याचा विक्रम श्रीकांत जिचकार यांच्या नावावर जमा आहे.
जिचकारांनी मिळवलेल्या यांमध्ये 20 पदव्यांमध्ये एमबीबीएस, एमडी, एलएलबी, एलएलएम, डीबीएम आणि एमबीए, जर्नालिझम यांचा समावेश आहे.
जिचकारांनी 10 विषयात एमए केले. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी, साहित्य, भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्व, मानसशास्त्र यांचा समावेश आहे.
जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची डी. लिट ही पदवी मिळवली.
जिचकारांनी मिळवलेल्या बहुतेक पदव्या या प्रथम श्रेणीतून मिळवल्या आहेत.
श्रीकांत जिचकार यांची भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तींच्या पंक्तीत गणती होते.
या ज्ञानयोगी चैतन्याच्या झऱ्याने ज्ञानदेवता सरस्वतीला ही अक्षरशः मोहून टाकलं. त्यामुळेच आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एकही वर्ष वाया जाऊ न देता बहुतेक सर्व पदव्यांवर नाव कोरलं.
जिचकार यांनी 1978 साली युपीएससीची परीक्षा दिली. यामध्ये त्यांनी अपेक्षित यश मिळवून ते आयपीएस झाले. पुढे दोनच वर्षांत म्हणजे 1980 साली आयएएस ची पदवी देखील घेऊन टाकली.
जिचकार यांच्या ग्रंथालयांमध्ये 52 हजार पुस्तकांचा संग्रह आहे.
विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आयएएसचा राजीनामा दिला.
या बुद्धिवंतांनी वयाच्या 25 व्या वर्षी पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि जिंकूनही दाखवली. जिचकार महाराष्ट्र विधानसभेमध्ये 1980 साली वयाच्या 25 व्या वर्षी निवडून गेले. महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वांत तरुण सभासद होते. जिचकारांनी बारा वर्षे विधानसभेमध्ये काम केले.

एकेकाळी त्यांच्याकडे 14 खात्यांचा कारभार होता. यानंतर त्यांनी राज्यसभेवरही धडक मारली. 1992 साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली. जिचकार 1998 सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. या काळामध्ये त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले. त्यांनी युनो आणि युनोस्को संघटनांसाठी ही काम केले.
जिचकार यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एका छोट्याशा गावात झाला. जगातील सर्वात हुशार दहा विद्यार्थ्यांमध्ये पहिला क्रमांकासह बुद्धिमान म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे. त्यांनी जगभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून मार्गदर्शन केले. डॉक्टर जिचकार यांनी जगातले पहिले कवी गुरूकुल कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक नागपूर येथे सुरू करून जगभर आपल्या संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांच्या मरणोपरांत त्यांचा परिवार नागपूरला वास्तव्यास आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचा डॉ. श्रीकांत जिचकार कर्मयोगी अवलियास सलाम.
डॉ. श्रीकांत जिचकार यांनी आपल्या संपूर्ण जीवन प्रवासात कमावलेल्या पदव्या :
1. Medical Doctor, MBBS and MD
2. Law, LL.B.
3. International Law, LL.M.
4. Masters in Business Administration, DBM and MBA
5. Bachelors in Journalism
6. M.A. Public Administration
7. M.A. Sociology
8. M.A. Economics
9. M.A. Sanskrit
10. M.A. History
11. M.A. English Literature
12. M.A. Philosophy
13.M.A. Political Science
14. M.A. Ancient Indian History, Culture and Archaeology
15. M.A Psychology
16. D. Litt. Sanskrit – the highest of degrees in a University
17. IPS
18. IAS

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोबाईल हँग होण्याची कारणे व उपाय.

मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी काय करावे?