शाओमी चा फुल डिस्प्ले बजेट फोन लवकरच भारतात

इमेज
शाओमीचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत येणार आहे. हा 2018 मधील भारतीय बाजारपेठेतील शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल. शाओमी इंडिया 14 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे, ज्यासाठी त्यांनी प्रसार माध्यमांना निमंत्रण पाठविले आहे. निमंत्रणामध्ये मोठा '5' लोगो वापरला गेला आहे. लोगो वरून हे स्पष्ट आहे की शाओमी आपला रेडमी 5 हा बजेट स्मार्टफोन 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करणार आहे. तसेच या स्मार्टफोन बरोबर रेडमी 5 प्लस देखील प्रदर्शित केला जाऊ शकतो. रेडमी 5 हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम / 64 जीबी स्टोरेज अशा तीन प्रकारात येण्याची शक्यता आहे. हा फोन चीनी बाजारपेठेत  डिसेंबरमध्ये ब्लॅक, गोल्ड, लाईट ब्लू, आणि रोझ गोल्ड अशा चार रंगांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. शाओमी Redmi 5 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज ची किंमत 799 चीनी युआन (सुमारे रु 8,100), 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज ची किंमत 899 चीनी युआन (रुपये 9,100) 4 जीबी रॅम ची किंमत 10,900 चिनी युआन (सुमारे 11,200 रुपये) आहे. शाओमी Redmi 5 प्लस 3 जीबी रॅम / 32 जीब

दसरा आणि दिवाळीचा धमाका.... शाओमी इंडियाचा!!


फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनचा सेल संपला परंतु आता शाओमीच्या सेलची वेळ आहे.

शाओमी :  भारतीय बाजारपेठेत मजबूत पकड निर्माण झालेली मोबाईल निर्माता कंपनी आहे. शाओमी दसरा आणि दिवाळी या दोन सणांच्या निमित्ताने  मोठ्या ऑफर आणणार आहे. मागील आठवड्यात सलग सेलच्या दरम्यान कंपनीची काही उत्पादने इतर ई-कॉमर्स वेबसाइटवरील ऑफर्स मध्ये विक्री करण्यात आली. परंतु 27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या कालावधीत कंपनी आपल्या स्वत:च्या वेबसाइटवर ( mi.com ) दसरा आणि दिवाळी धमाका उडवून टाकणार आहे.
शाओमी म्हणते की दसरा आणि दिवाळी विक्री दरम्यान Mi.com वर सूचीबद्ध केलेल्या सर्व उत्पादनांवर मोठी ऑफर दिली जाईल. त्यात रेडमी 4, रेडमी नोट 4, एमआय मॅक्स 2, रेडमी 4 ए, एमआय A1 स्मार्टफोनचा समावेश आहे.  Mi A1 ने नुकताच लाँच केलेला फोन आहे.
विक्रीदरम्यान केवळ स्मार्टफोनच नव्हे तर Mi band HRX एडिशन आणि एमआय पावर बँकसारख्या विशिष्ट श्रेणींमध्येही आॅफर देऊ केली जाईल.
गेल्या महिन्यामध्येच लाँच झालेल्या रेडमी नोट 4 ब्लू एडीशनवर लिमिटेड सेल ऑफर देण्यात येईल. कंपनी Mi सदस्यांना देखील सवलत कुपन्स आणि एफ-कोडसह विशेष ऑफर सादर करेल.
याशिवाय तीन दिवसीय सेलमध्ये सकाळी 11 ते 5 च्या दरम्यान एक रुपयाचा फ्लॅश सेल आयोजित केला जाईल. तसेच दुपारी 4 वाजता        फास्टेस्ट फिंगर फर्स्ट स्पर्धा आयोजित केली जाईल.
विक्री दरम्यान शाओमी रेडमी नोट 4 च्या 3 जीबी मॉडेलवर 1000 रुपये सूट देईल. या बाबतीत, ग्राहक 9,999 रु. साठी ते विकत घेण्यास सक्षम असेल. त्याच वेळी 12,999 रुपयांच्या ऐवजी ग्राहक 4GB मॉडेल्स 10,999 रुपयांमध्ये खरेदी करण्यास सक्षम असतील. त्याचप्रमाणे कंपनीने माहिती दिली आहे की शाओमी रेडमी 4 वर 1500 रुपये सुट दिली जाईल. ही ऑफर स्मार्टफोनच्या सर्व तीन रूपांवर ( मॉडेल ) उपलब्ध असेल.

उद्यापासून विक्रीमध्ये शाओमी आपल्या Mi Headphones Comfort White वर 300 रुपये सूट देईल, त्याची वास्तविक किंमत 2,999 रुपये आहे. ग्राहकांना 20000 mAh Power Bank 2 white वर 400 रुपयांची सवलत देण्यात येईल ज्याची किंमत 2,199 रुपयांऐवजी 1,799 रुपये होईल.
Mi Air Purifier 2  ही उद्या 9,999 रुपयांऐवजी 8,499 रुपयांसाठी उपलब्ध असेल. 10000 mAh power bank 2 black मध्ये ग्राहकांना 300 रुपये सूट दिली जाईल.

अन्य मोठ्या ऑफर आणि सूट जाणून घेण्यासाठी ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवर ( mi.com ) संपर्क साधू शकतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शैक्षणिक क्षेत्रातील "महामेरू"

मोबाईल हँग होण्याची कारणे व उपाय.

मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी काय करावे?