शाओमीने भारतामध्ये आपली नवीन स्मार्टफोन मालिका Redmi Y ची ओळख करुन दिली.भारतीय बाजारपेठेत शाओमीने Redmi Y1 आणि Redmi Y1 Lite असे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.
रेडमी वाईचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा.
याव्यतिरिक्त, हा अँड्रॉइड नुगटसह एमआय युआय 9 वर चालणारा कंपनीचा भारतातील पहिला फोन आहे. रेडमी वाई 1 लाइट हा रेडमि वाई 1 ची छोटी आवृत्ती आहे. दोन्ही स्मार्टफोन गोल्ड आणि डार्क ग्रे रंगांमध्ये उपलब्ध केले गेले आहेत.
किंमत आणि शाओमी रेडमी Y1 आणि रेडमी Y1 लाईटची उपलब्धता.
शाओमी रेडमी वाई 1 ची किंमत 8999 पासून सुरु होते. या किंमतीला तुम्हाला 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएन्ट मिळेल. तसेच 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजच व्हेरिएन्ट 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. शाओमी रेडमी Y1 लाइट हँडसेट 6,999 रुपयांना उपलब्ध असेल. हे दोन्ही स्मार्टफोन ईकॉमर्स साइट अॅमेझॉन इंडिया आणि मी डॉट कॉम वर उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनचा पहिला सेल 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे.
शाओमी रेडमी Y1 ची वैशिष्ट्ये
शाओमी रेडमी Y1 मध्ये 5.5 इंची एचडी स्क्रीन आहे. यावर कॉर्निंग गोरिला ग्लासचे संरक्षण आहे. कंपनीने फोनमध्ये ओक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 435 प्रोसेसरचा उपयोग केला आहे. ग्राफिक्ससाठी Adreno 505 GPU चा समावेश आहे. मल्टीटास्किंगसाठी 3 जीबी रॅम तसेच इनबिल्ट स्टोरेज 32 जीबी आहे आणि आवश्यक असलेल्यांना 128 जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्ड वापरणे शक्य आहे. ही चांगली बातमी आहे की या रेडमी वाई सिरीज फोनमध्ये कंपनीने मायक्रो एसडी कार्डसाठी एक वेगळा स्लॉट दिला आहे. यामुळे तुम्ही एकाच वेळेस दोन सीमकार्ड आणि एक मायक्रो एसडी कार्ड यांचा वापर करू शकता. या सुविधेमुळे तुम्ही कमी स्टोरेज असलेला मोबाईल सुद्धा निवडू शकता.
शाओमी रेडमी Y1 मध्ये 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा ( अपर्चर 2.2 ) आहे, जो PDAF बरोबर येतो. फ्रंट पॅनलला सेल्फि प्रेमींसाठी एलईडी फ्लॅशसह 16 मेगापिक्सलचा कॅमेरा ( अपर्चर 2.0 ) मिळेल. बॅटरी 3080 एमएएच आहे. हँडसेटची परिमाणे 153x76.2x7.7 मिलीमीटर आणि वजन 153 ग्रॅम आहे.
शाओमी रेडमी Y1 Light ची वैशिष्ट्ये
शाओमी रेडमी Y1 लाइटमध्ये 5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. रेडमी Y1 लाईट मध्ये क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसरचा वापर केलेला आहे. हा 2 जीबी रॅम आणि 16 जीबी इनबिल्ट स्टोरेजसह येतो. यामध्येही आपण 128 जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डचा वापर करु शकता. फोनची बॅटरी 3080 एमएएच आहे. यामध्ये 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 5 फ्रंट कॅमेरा आहे. रियर कॅमेरा सेन्सर फेज डिटेक्शन ऑटो फोकससह सुसज्ज आहे.हँडसेटची परिमाणे 153x76.2x7.55 मिलीमीटर आणि वजन 150 ग्रॅम आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा