शाओमी चा फुल डिस्प्ले बजेट फोन लवकरच भारतात


शाओमीचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत येणार आहे. हा 2018 मधील भारतीय बाजारपेठेतील शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल. शाओमी इंडिया 14 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे, ज्यासाठी त्यांनी प्रसार माध्यमांना निमंत्रण पाठविले आहे. निमंत्रणामध्ये मोठा '5' लोगो वापरला गेला आहे. लोगो वरून हे स्पष्ट आहे की शाओमी आपला रेडमी 5 हा बजेट स्मार्टफोन 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करणार आहे. तसेच या स्मार्टफोन बरोबर रेडमी 5 प्लस देखील प्रदर्शित केला जाऊ शकतो.

रेडमी 5 हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम / 64 जीबी स्टोरेज अशा तीन प्रकारात येण्याची शक्यता आहे. हा फोन चीनी बाजारपेठेत  डिसेंबरमध्ये ब्लॅक, गोल्ड, लाईट ब्लू, आणि रोझ गोल्ड अशा चार रंगांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. शाओमी Redmi 5 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज ची किंमत 799 चीनी युआन (सुमारे रु 8,100), 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज ची किंमत 899 चीनी युआन (रुपये 9,100) 4 जीबी रॅम ची किंमत 10,900 चिनी युआन (सुमारे 11,200 रुपये) आहे. शाओमी Redmi 5 प्लस 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज ची किंमत 999 चीनी युआन (रु 10,200), 4 जीबी रॅम / 64 जीबी स्टोरेज ची किंमत 1,299 चीनी युआन (रु 13,200) एवढी आहे. भारतात या हँडसेटची किंमत आणि उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
रेडमी 5 आणि रेडमी 5 प्लसची वैशिष्ट्ये

शाओमी रेडमी 5 ची वैशिष्ट्ये
हा एक डुअल सिम फोन आहे. याचा डिस्प्ले 5.7-इंच एचडी प्लस (720x1440 पिक्सेल) आहे. या डिस्प्लेचा रेशिओ 18: 9 एवढा आहे. रेडमी 5 मध्ये स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर आहे. रेडमी 5 मध्ये 2 जीबी, 3 जीबी आणि 4 जीबी रॅम असतील. रेडमी 5 मध्ये 12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे जो 1.25 माइक्रोन पिक्सेल सेंसर आणि फ्लॅशसह येतो. फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून तो सॉफ्ट लाइट फ्लॅश सह येतो. कंपनी सौंदर्य 3.0 ऍप वर जोर देऊन फोनची स्तुती करीत आहे. पोर्ट्रेट प्रतिमा सुधारण्यासाठी असा दावा केला गेला आहे. रेडमी 5 मध्ये 3300 एमएएचची बॅटरी आहे.

रेडमी 5 प्लसची वैशिष्ट्ये

हा एक डुअल सिम फोन आहे. रेडमी 5 प्लसमध्ये 5.99 इंच फुल एचडी + (1080x2160 पिक्सेल) डिस्प्ले आहे.  या डिस्प्लेचा रेशिओ 18: 9 एवढा आहे. रेडमी 5 प्लसमध्ये स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आहे. रेडमी 5 प्लसमध्ये 3 जीबी रॅम आणि 4 जीबी रॅम ऑप्शन्स असतील. रेडमी 5 प्लसमध्ये 12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे जो 1.25 माइक्रोन पिक्सेल सेंसर आणि फ्लॅशसह येतो. फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून तो सॉफ्ट लाइट फ्लॅश सह येतो. कंपनी सौंदर्य 3.0 ऍपवर जोर देऊन फोनची स्तुती करीत आहे. पोर्ट्रेट प्रतिमा सुधारण्यासाठी असा दावा केला गेला आहे. रेडमी 5 प्लसमध्ये 4000 एमएएचची बॅटरी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शैक्षणिक क्षेत्रातील "महामेरू"

मोबाईल हँग होण्याची कारणे व उपाय.

मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी काय करावे?