शाओमी चा फुल डिस्प्ले बजेट फोन लवकरच भारतात

इमेज
शाओमीचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत येणार आहे. हा 2018 मधील भारतीय बाजारपेठेतील शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल. शाओमी इंडिया 14 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे, ज्यासाठी त्यांनी प्रसार माध्यमांना निमंत्रण पाठविले आहे. निमंत्रणामध्ये मोठा '5' लोगो वापरला गेला आहे. लोगो वरून हे स्पष्ट आहे की शाओमी आपला रेडमी 5 हा बजेट स्मार्टफोन 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करणार आहे. तसेच या स्मार्टफोन बरोबर रेडमी 5 प्लस देखील प्रदर्शित केला जाऊ शकतो. रेडमी 5 हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम / 64 जीबी स्टोरेज अशा तीन प्रकारात येण्याची शक्यता आहे. हा फोन चीनी बाजारपेठेत  डिसेंबरमध्ये ब्लॅक, गोल्ड, लाईट ब्लू, आणि रोझ गोल्ड अशा चार रंगांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. शाओमी Redmi 5 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज ची किंमत 799 चीनी युआन (सुमारे रु 8,100), 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज ची किंमत 899 चीनी युआन (रुपये 9,100) 4 जीबी रॅम ची किंमत 10,900 चिनी युआन (सुमारे 11,200 रुपये) आहे. शाओमी Redmi 5 प्लस 3 जीबी रॅम / 32 जीब

मोबाईल हँग होण्याची कारणे व उपाय.



जर तुमच्याकडे एक अँड्रॉइड फोन आहे तर तुमच्या समोर उभा असणारा प्रश्न म्हणजे मोबाईल हँग होणे . मोबाईल हँग होणे ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे. बऱ्याच वेळा मोबाईल हँग झाल्यामुळे आपण अडचणीत येतो. सध्या या समस्येमुळे बरेच मोबाईल वापरणारे लोक त्रस्त आहेत. प्रत्येकाला भेडसावत असणारा प्रश्न म्हणजे मोबाईल हँग का होतो. आज आपण मोबाईल हँग का होतो आणि त्यावरील उपाय काय या विषयावरच बोलणार आहोत.

मोबाइल हँग होण्याची कारणे :-
मोबाईल हँग होण्याची अनेक कारणे आहेत परंतु त्यातील महत्वाची म्हणजे मोबाईल मधील साठवण क्षमता आणि रॅम ही आहेत. आपल्या फोनची
इंटर्नल मेमरी कमी असेल किंवा आपल्या मोबाईलची रॅम कमी असेल तर आपला मोबाईल हँग होऊ शकतो. त्यामुळे कधीही मोबाइल खरेदी करताना आपल्या वापरानुसार मोबाईलच्या इंटरनल स्टोरेज ची निवड करा आणि त्याबरोबर रॅमची सुद्धा निवड करा. आपल्या फोनची रॅम जेवढी जास्त असेल तेवढा आपला फोन हँग होण्याची शक्यता कमी असते. परंतु ज्यांच्यापाशी सध्या मोबाईल आहे ते तर लगेच आपला मोबाईल बदलू शकत नाहीत. त्यांच्यासाठीच आज आपण पाहूयात मोबाईल हँग होऊ नये यासाठी काही उपाय.

मोबाइल हँग होऊ नये यासाठी उपाय :-

बरेच जण आपल्या मोबाईल मध्ये विविध प्रकारच्या गेम्स तसेच अनेक प्रकारची फोटो एडिट करणारी अॅप्लिकेशन डाउनलोड करून ठेवतात. मोबाईल हँग होण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. या ॲप्लिकेशनमुळे आपल्या मोबाईलच्या रॅमवर ताण येतो व आपला मोबाइल हँग होतो. यासाठी आपल्या मोबाईलमधील आवश्यक नसणाऱ्या गेम्स व अॅप्लिकेशन डिलीट करून टाका.

आपल्या मोबाईल मध्ये अशी काही अप्लिकेशन असतात की ज्यांचा वापर आपण खूप कमी करतो. परंतु ती आपल्यासाठी आवश्यक असतात. अशी अप्लीकेशन आपण  स्टॉप करून ठेवा. स्टॉप करण्याची प्रक्रिया
Setting>App>Manage Application>select app>force stop

आपल्या फोनमध्ये सर्व प्रकारची antivirus ॲप्स आणि बॅटरी सेवर अॅप्स डिलीट करून टाका. कारण ही अॅप्स कोणत्याही कामाची नसतात. ही ऍप्स फक्त आपल्या मोबाईलची मेमरी कमी करण्याचे काम करतात.

आपल्या फोनची इंटर्नल मेमरी नेहमी मोकळी ठेवावी. इंटरनल मेमरी कमी पडत असेल तर आपली काही अॅप्स मेमरी कार्डवर इंस्टॉल करा.
मेमरी कार्ड देखील पुर्णपणे भरुन टाकू नका. त्यामध्ये देखील काही जागा मोकळी ठेवा.

जर तुम्ही इंटरनेट चा वापर करत असाल तर वेळोवेळी कुकीज डिलीट करा.

या सर्व उपाययोजना केल्या तर आपला फोन हँग होणार नाही. या उपाय योजना करुन देखील जर कोणाचा मोबाईल हँग होत असेल तर आपल्या फोनला फॅक्टरी रिसेट करा. आपला फोन 100% हँग होणार नाही.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शैक्षणिक क्षेत्रातील "महामेरू"

मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी काय करावे?