पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शाओमी चा फुल डिस्प्ले बजेट फोन लवकरच भारतात

इमेज
शाओमीचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत येणार आहे. हा 2018 मधील भारतीय बाजारपेठेतील शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल. शाओमी इंडिया 14 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे, ज्यासाठी त्यांनी प्रसार माध्यमांना निमंत्रण पाठविले आहे. निमंत्रणामध्ये मोठा '5' लोगो वापरला गेला आहे. लोगो वरून हे स्पष्ट आहे की शाओमी आपला रेडमी 5 हा बजेट स्मार्टफोन 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करणार आहे. तसेच या स्मार्टफोन बरोबर रेडमी 5 प्लस देखील प्रदर्शित केला जाऊ शकतो. रेडमी 5 हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम / 64 जीबी स्टोरेज अशा तीन प्रकारात येण्याची शक्यता आहे. हा फोन चीनी बाजारपेठेत  डिसेंबरमध्ये ब्लॅक, गोल्ड, लाईट ब्लू, आणि रोझ गोल्ड अशा चार रंगांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. शाओमी Redmi 5 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज ची किंमत 799 चीनी युआन (सुमारे रु 8,100), 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज ची किंमत 899 चीनी युआन (रुपये 9,100) 4 जीबी रॅम ची किंमत 10,900 चिनी युआन (सुमारे 11,200 रुपये) आहे. शाओमी Redmi 5 प्लस 3 जीबी रॅम / 32 जीब

सेल्फी प्रेमीसाठी रेडमीची ची खास भेट.

इमेज
शाओमीने भारतामध्ये आपली नवीन स्मार्टफोन मालिका Redmi Y ची ओळख करुन दिली.भारतीय बाजारपेठेत शाओमीने  Redmi Y1 आणि Redmi Y1 Lite असे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. रेडमी वाईचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा. याव्यतिरिक्त, हा अँड्रॉइड नुगटसह एमआय युआय 9 वर चालणारा कंपनीचा भारतातील पहिला फोन आहे.  रेडमी वाई 1 लाइट हा रेडमि वाई 1 ची छोटी आवृत्ती आहे. दोन्ही स्मार्टफोन गोल्ड आणि डार्क ग्रे रंगांमध्ये उपलब्ध केले गेले आहेत. किंमत आणि शाओमी रेडमी Y1 आणि रेडमी Y1 लाईटची उपलब्धता. शाओमी रेडमी वाई 1 ची किंमत 8999 पासून सुरु होते. या किंमतीला तुम्हाला 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएन्ट मिळेल. तसेच 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजच व्हेरिएन्ट 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. शाओमी रेडमी Y1 लाइट हँडसेट 6,999 रुपयांना उपलब्ध असेल. हे दोन्ही स्मार्टफोन ईकॉमर्स साइट अॅमेझॉन इंडिया आणि मी डॉट कॉम वर उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनचा पहिला सेल 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. शाओमी रेडमी Y1 ची वैशिष्ट्ये शाओमी रेडमी Y1 मध्ये 5.5 इंची एचडी

वॉट्सऍप मेसेज डिलीट सुविधा आता प्रत्येकासाठी.

इमेज
गेल्या काही महिन्यांपासून टेस्टिंग मोडमध्ये असलेली व्हाट्सऍप मेसेज डिलीट सुविधा आता सर्वांसाठी उपलब्ध झाली आहे. बर्‍याच दिवसापासून ह्या सुविधेचा वापर फक्त काही निवडक लोक घेत होते परंतु व्हाट्सऍपने ही सुविधा आता सर्वांसाठी खुली केली आहे. या सुविधेला मेसेज रिकॉल असेही म्हटले आहे. काही वेळेस आपण आपल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडशी चॅटिंग करत असताना गडबडीमध्ये आपल्या कडून एखादा मेसेज दुसऱ्या व्यक्तीस पाठवला जातो. असे भरपूर जणांच्या बाबतीत होते. त्यावेळेस मात्र आपल्यापुढे पश्चात्ताप करण्यावाचून कुठलाच मार्ग उरत नाही. परंतु आता चिंता करण्याची गरज नाही कारण व्हाट्सऍपने तो मेसेज डिलिट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या नवीन सुविधेनुसार आपण एखाद्या व्यक्तीस किंवा ग्रुपमध्ये पाठवलेला मेसेज डिलीट करू शकतो. यासाठी आपणास जो मेसेज डिलिट करायचा आहे त्याला सिलेक्ट करावे लागेल. सिलेक्ट केल्यानंतर स्क्रीनच्या वरील बाजूस पर्यायाची पट्टी दिसेल. त्यामध्ये डिलीटचा डब्बा दिसेल. त्यावर क्लिक केल्यास आपला मेसेज डिलीट होईल. परंतु यासाठी आपणाकडे फक्त सात मिनिटांचा अवधी असेल म्हणजेच आपण एखा

शैक्षणिक क्षेत्रातील "महामेरू"

इमेज
एकच माणूस डॉक्टर होता, तो वकील ही होता, तो आयपीएस अधिकारी होता, तसंच आयएएस अधिकारीही होता. याशिवाय तो पत्रकारही होता, इतकच नाही तर कीर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. इतक्या पदव्या मिळणारा न्याययोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय. श्रीकांत जिचकार यांच नांव आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. जिचकारांचा 2004 साली अपघाती मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आज कोर्टाने एसटी महामंडळाला जबाबदार धरलं आहे. तसंच जिचकार यांच्या कुटुंबियांना 50 लाख 67 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील महामेरू म्हणून संबोधता येईल असं नाव म्हणजे श्रीकांत जिचकार होय. अवघ्या 49 वर्षातील जीवन, 42 विद्यापीठ, 20 पदव्या आणि 28 सुवर्णपदक असा ज्ञानाचा खजिना या अवलियाने  जिंकला. आयएएस असो वा आयपीएस, एलएलएम असो वा एमबीबीएस देशातील बहुतेक सर्वच पदव्या मिळविण्याचा विक्रम श्रीकांत जिचकार यांच्या नावावर जमा आहे. जिचकारांनी मिळवलेल्या यांमध्ये 20 पदव्यांमध्ये एमबीबीएस, एमडी, एलएलबी, एलएलएम, डीबीएम आणि एमबीए, जर्नालिझम यांचा समावेश आहे. जिचकारांनी 10 विषयात एमए केले. यामध्ये लोकप्र

रिलायन्स डिजिटल टीव्ही डिटीएच सेवा कायमची बंद

इमेज
रिलायन्स कम्युनिकेशनने ऑगष्ट 2008 मध्ये रिलायन्स बिग टीव्ही ही डिटीएच सेवा भारतामध्ये सादर केली. अवघ्या 90 दिवसांमध्येच दहा लाख  ग्राहक कंपनीला जोडले गेले होते. काही वर्षांपूर्वी रिलायन्स बिग टीव्ही ऐवजी रिलायन्स डिजिटल टिव्ही हे नवीन नाव देण्यात आले. सध्या कंपनीकडील वर्तमान ग्राहकांची संख्या पन्नास लाख एवढी आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्स डिजिटल टीव्ही कडून आपल्या ग्राहकांना योग्य ती सेवा दिली जात नसल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. त्यांच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क केल्यास तो क्वचितच जोडला जात होता. ग्राहक सेवा मंचामध्ये संपर्क झाल्यास समाधानकारक सेवा मिळत नव्हती. तसेच चैनल लिस्ट पैकी बऱ्याचशा वाहिन्यांचे प्रक्षेपण खंडित झाले होते. या असुविधेमागील कारण आणखीनही कंपनीने उघड केलेले नाही. मागील आठवड्यामध्ये केलेल्या घोषणेनुसार रिलायन्स डिजिटल टीव्ही हि डिटीएच सेवा 18 नोव्हेंबर 2017 पासून कायमची बंद होणार आहे. यामागील कारण सांगताना कंपनीचा प्रवक्ता असा म्हणाला की कंपनीचा परवाना समाप्त होत असल्यामुळे आम्ही आमची डीटीएच सेवा बंद करत आहोत. वर्तमान ग्राहकांचे काय होणार ?