शाओमी चा फुल डिस्प्ले बजेट फोन लवकरच भारतात

इमेज
शाओमीचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत येणार आहे. हा 2018 मधील भारतीय बाजारपेठेतील शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल. शाओमी इंडिया 14 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे, ज्यासाठी त्यांनी प्रसार माध्यमांना निमंत्रण पाठविले आहे. निमंत्रणामध्ये मोठा '5' लोगो वापरला गेला आहे. लोगो वरून हे स्पष्ट आहे की शाओमी आपला रेडमी 5 हा बजेट स्मार्टफोन 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करणार आहे. तसेच या स्मार्टफोन बरोबर रेडमी 5 प्लस देखील प्रदर्शित केला जाऊ शकतो. रेडमी 5 हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम / 64 जीबी स्टोरेज अशा तीन प्रकारात येण्याची शक्यता आहे. हा फोन चीनी बाजारपेठेत  डिसेंबरमध्ये ब्लॅक, गोल्ड, लाईट ब्लू, आणि रोझ गोल्ड अशा चार रंगांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. शाओमी Redmi 5 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज ची किंमत 799 चीनी युआन (सुमारे रु 8,100), 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज ची किंमत 899 चीनी युआन (रुपये 9,100) 4 जीबी रॅम ची किंमत 10,900 चिनी युआन (सुमारे 11,200 रुपये) आहे. शाओमी Redmi 5 प्लस 3 जीबी रॅम / 32 जीब

रिलायन्स डिजिटल टीव्ही डिटीएच सेवा कायमची बंद


रिलायन्स कम्युनिकेशनने ऑगष्ट 2008 मध्ये रिलायन्स बिग टीव्ही ही डिटीएच सेवा भारतामध्ये सादर केली. अवघ्या 90 दिवसांमध्येच दहा लाख  ग्राहक कंपनीला जोडले गेले होते. काही वर्षांपूर्वी रिलायन्स बिग टीव्ही ऐवजी रिलायन्स डिजिटल टिव्ही हे नवीन नाव देण्यात आले. सध्या कंपनीकडील वर्तमान ग्राहकांची संख्या पन्नास लाख एवढी आहे.
परंतु गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्स डिजिटल टीव्ही कडून आपल्या ग्राहकांना योग्य ती सेवा दिली जात नसल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. त्यांच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क केल्यास तो क्वचितच जोडला जात होता. ग्राहक सेवा मंचामध्ये संपर्क झाल्यास समाधानकारक सेवा मिळत नव्हती. तसेच चैनल लिस्ट पैकी बऱ्याचशा वाहिन्यांचे प्रक्षेपण खंडित झाले होते. या असुविधेमागील कारण आणखीनही कंपनीने उघड केलेले नाही.
मागील आठवड्यामध्ये केलेल्या घोषणेनुसार रिलायन्स डिजिटल टीव्ही हि डिटीएच सेवा 18 नोव्हेंबर 2017 पासून कायमची बंद होणार आहे. यामागील कारण सांगताना कंपनीचा प्रवक्ता असा म्हणाला की कंपनीचा परवाना समाप्त होत असल्यामुळे आम्ही आमची डीटीएच सेवा बंद करत आहोत.
वर्तमान ग्राहकांचे काय होणार ?
वर्तमान ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी रिलायन्स डिजिटल टीव्हीने टाटा स्काय सोबत करार केला आहे. या करारानुसार वर्तमान ग्राहकांना टाटा स्काय कडून नवीन कनेक्शन अगदी मोफत दिले जाणार आहे. यासाठी ग्राहकांना 18 नोव्हेंबर 2017 पूर्वी आपल्या रिलायन्स डिजिटल टीव्हीवर रजिस्टर असलेल्या मोबाईल क्रमांकावरून 92370 92370 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. मिस्ड कॉल दिल्यानंतर टाटा स्काय चा प्रतिनिधी आपल्याशी संपर्क करेल व नवीन कनेक्शन बसवण्यासाठी वेळ व तारीख निश्‍चित करेल. त्यानुसार त्यांचा टेक्नीशियन घेऊन आपल्याकडील रिलायन्स डिजिटल टीव्हीचा जुना सेट टॉप बॉक्स घेऊन जाईल व त्याठिकाणी टाटा स्काय चा नवीन सेट टॉप बॉक्स बसविण्यात येईल. तसेच आपल्या रिलायन्स डिजिटल टीव्ही अकाऊंटवरील उर्वरित रक्कम टाटा स्कायच्या अकाऊंटवर जमा होईल. प्रक्रियेसाठी ग्राहकांना कोणतीही रक्कम मोजावी लागणार नाही.
ही बातमी जास्तीत जास्त शेयर करा यामुळे कोणालाही त्रास होणार नाही किंवा कोणाची फसवणूक होणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शैक्षणिक क्षेत्रातील "महामेरू"

मोबाईल हँग होण्याची कारणे व उपाय.

मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी काय करावे?