शाओमी चा फुल डिस्प्ले बजेट फोन लवकरच भारतात

इमेज
शाओमीचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत येणार आहे. हा 2018 मधील भारतीय बाजारपेठेतील शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल. शाओमी इंडिया 14 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे, ज्यासाठी त्यांनी प्रसार माध्यमांना निमंत्रण पाठविले आहे. निमंत्रणामध्ये मोठा '5' लोगो वापरला गेला आहे. लोगो वरून हे स्पष्ट आहे की शाओमी आपला रेडमी 5 हा बजेट स्मार्टफोन 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करणार आहे. तसेच या स्मार्टफोन बरोबर रेडमी 5 प्लस देखील प्रदर्शित केला जाऊ शकतो. रेडमी 5 हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम / 64 जीबी स्टोरेज अशा तीन प्रकारात येण्याची शक्यता आहे. हा फोन चीनी बाजारपेठेत  डिसेंबरमध्ये ब्लॅक, गोल्ड, लाईट ब्लू, आणि रोझ गोल्ड अशा चार रंगांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. शाओमी Redmi 5 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज ची किंमत 799 चीनी युआन (सुमारे रु 8,100), 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज ची किंमत 899 चीनी युआन (रुपये 9,100) 4 जीबी रॅम ची किंमत 10,900 चिनी युआन (सुमारे 11,200 रुपये) आहे. शाओमी Redmi 5 प्लस 3 जीबी रॅम / 32 जीब

वॉट्सऍप मेसेज डिलीट सुविधा आता प्रत्येकासाठी.


गेल्या काही महिन्यांपासून टेस्टिंग मोडमध्ये असलेली व्हाट्सऍप मेसेज डिलीट सुविधा आता सर्वांसाठी उपलब्ध झाली आहे. बर्‍याच दिवसापासून ह्या सुविधेचा वापर फक्त काही निवडक लोक घेत होते परंतु व्हाट्सऍपने ही सुविधा आता सर्वांसाठी खुली केली आहे. या सुविधेला मेसेज रिकॉल असेही म्हटले आहे.

काही वेळेस आपण आपल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडशी चॅटिंग करत असताना गडबडीमध्ये आपल्या कडून एखादा मेसेज दुसऱ्या व्यक्तीस पाठवला जातो. असे भरपूर जणांच्या बाबतीत होते. त्यावेळेस मात्र आपल्यापुढे पश्चात्ताप करण्यावाचून कुठलाच मार्ग उरत नाही. परंतु आता चिंता करण्याची गरज नाही कारण व्हाट्सऍपने तो मेसेज डिलिट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या नवीन सुविधेनुसार आपण एखाद्या व्यक्तीस किंवा ग्रुपमध्ये पाठवलेला मेसेज डिलीट करू शकतो. यासाठी आपणास जो मेसेज डिलिट करायचा आहे त्याला सिलेक्ट करावे लागेल. सिलेक्ट केल्यानंतर स्क्रीनच्या वरील बाजूस पर्यायाची पट्टी दिसेल. त्यामध्ये डिलीटचा डब्बा दिसेल. त्यावर क्लिक केल्यास आपला मेसेज डिलीट होईल.

परंतु यासाठी आपणाकडे फक्त सात मिनिटांचा अवधी असेल म्हणजेच आपण एखाद्याला मेसेज पाठवलेल्या वेळेनंतर आपल्याला तो मेसेज डिलीट करण्यासाठी सात मिनिटांचा कालावधी असेल. या सात मिनिटांमध्ये आपल्याला तो मेसेज डिलीट करावा लागेल. 7 मिनिटानंतर तो मेसेज आपण डिलीट करू शकणार नाहीत. तसेच त्या मेसचे पुढील व्यक्तीने वाचन केलेले नसावे. जर तो मेसेज पुढील व्यक्तीने वाचन केला असेल तर तो मेसेज आपण डिलीट करू शकत नाहीत. आपण या सुविधेचा वापर वैयक्तिक किंवा ग्रुपमध्ये पाठवलेला मेसेज डिलिट करण्यासाठी करू शकतो. आपण एखाद्या ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये पाठवलेला मेसेज आपण या सुविधेचा वापर करून डिलीट करू शकणार नाहीत.

आपल्या मोबाईलमध्ये ही सुविधा कशी मिळवणार ?

व्हाट्सऍपने ही सुविधा अँड्रॉइड, आयफोन व विंडोज या ऑपरेटिंग सिस्टमसाठी उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपणास आपले व्हाट्सऍप अपडेट करावे लागेल. अपडेट केल्यानंतर ही सुविधा आपल्या मोबाईलवर उपलब्ध होईल.

या सुविधेची माहिती आपल्या सर्व मित्रांना देण्यासाठी ही पोस्ट आपल्या मित्रांमध्ये शेयर करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोबाईल हँग होण्याची कारणे व उपाय.

शैक्षणिक क्षेत्रातील "महामेरू"

मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी काय करावे?