शाओमी रेडमी 5A भारतामध्ये लॉन्च झाला आहे. सर्वात प्रथम शाओमीने आपल्या रेडमी 5A स्मार्टफोनला ऑक्टोबर मध्ये चीनमध्ये लॉन्च केले होते. भारतामध्ये या फोनची मार्केटिंग ‘ देश का स्मार्टफोन ’ अशी केली जात आहे. स्मार्टफोनचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कंपनी या स्मार्टफोनमध्ये आठ दिवसांची बॅटरी लाईफ ( स्टैंडबाय टाइम) असल्याचा दावा करत आहे. रेडमी 5A मध्ये मीयूआई 9 प्रीलोड असणार आहे, ज्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लाईफ वाढण्यास मदत मिळणार आहे. हा स्मार्टफोन गेल्यावर्षीच्या रेडमी 4A ची सुधारित आवृत्ती आहे. शाओमी रेडमी 5A च्या भारतीय आवृत्तीमध्ये वेगळा असा मायक्रो एसडी कार्ड स्लॉट आहे. हा स्मार्टफोन 2 स्टोरेज क्षमतेत उपलब्ध आहे. एक 3 जीबी रॅम 32 जीबी स्टोरेज आणि 2 जीबी रॅम 16 जीबी स्टोरेज.
शाओमी रेडमी 5A ची भारतातील किंमत व लॉन्च ऑफर
रेडमी 5A च्या 2 जीबी रॅम आवृत्तीची किंमत भारतामध्ये 5999 रुपये आहे, यामुळे हा भारतातील शाओमीचा सगळ्यात स्वस्त मोबाईल ठरला आहे. 3जीबी रेम 32 जीबी स्टोरेज आवृत्तीची किंमत 6999 रुपये आहे. हे फोन भारतामध्ये 7 डिसेंबर 2017 रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट, मीडॉटकॉम आणि मी होम स्टोर वर उपलब्ध असतील.स्मार्टफोन डार्क ग्रे, गोल्ड आणि रोज़ गोल्ड कलर मध्ये उपलब्ध आहे.
लॉन्च ऑफर नुसार, शाओमी रेडमी 5A ची 2 जीबी रैम/16 जीबी आवृत्ती खरेदी करणार्या पहिल्या 50 लाख ग्राहकांना 1000 रुपयांची सूट मिळणार आहे. म्हणजेच हा फोन फक्त 4999 रुपयाला खरेदी करता येणार आहे.
शाओमी रेडमी 5A स्पेसिफिकेशन
डबल सिम वाला शाओमी रेडमी 5A एन्ड्रॉयड नूगा आधारित मीयूआई 9 वर चालणारा आहे. यामध्ये एक 5 इंच एचडी (720x1280 पिक्सल) डिस्प्ले आहे ज्याची पिक्सल डेनसिटी 296 पीपीआई एवढी आहे. फोन मध्ये एक क्वाड-कोर क्वालकॉम 425 प्रोसेसर आहे जो 1.4 गीगाहर्ट्ज़ वर चालणारा आहे. स्मार्टफोन मध्ये अपर्चर एफ/2.0, एलईडी फ्लैश और पीडीएएफ सह 13 मेगापिक्सल रियर कॅमेरा आहे. समोरील बाजूस सेल्फी आणि व्हिडिओ चॅटिंग साठी अपर्चर एफ/2.0 सह 5 मेगापिक्सल कॅमेरारा दिला आहे.
रेडमी 5A मध्ये 16 जीबी आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे ज्याला आपण माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128 जीबी पर्यंत वाढवू शकतो. कनेक्टिविटी साठी फोनमध्ये 4जी वीओएलटीई, वाई-फाई 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 4.1, जीपीएस/ए-जीपीएस, इन्फ्रारेड, एक 3.5 एमएम ऑडियो जैक आणि एक माइक्रो-यूएसबी पोर्ट दिला आहे. फोन मध्ये एक्सीलेरोमीटर, एम्बियंट लाइट सेंसर आणि एक प्रॉक्सिमिटी सेंसर आहे. फोनला पावर देण्यासाठी 3000 एमएएच ची बॅटरी आहे. ज्याचा कंपनीने आठ दिवसाचा स्टैंडबाय टाइम आणि 7 तासापर्यंत वीडियो प्लेबैक टाइम मिळण्याचा दावा केला आहे. फोनचे मोजमाप 140.4 x 70.1 x 8.35 मिलीमीटर आणि वज़न 137 ग्राम एवढे आहे.
Best casinos for 2021 and find the best bonus codes
उत्तर द्याहटवा1. Red Dog Casino – Best casino for 룰렛 all casino games · 2. 다파벳 Bovada Casino – Best casino for players 케이벳 with strong track record · 바카라분석기 3. 슬롯머신 게임 Bovada Casino – Best casino for