शाओमी चा फुल डिस्प्ले बजेट फोन लवकरच भारतात

इमेज
शाओमीचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत येणार आहे. हा 2018 मधील भारतीय बाजारपेठेतील शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल. शाओमी इंडिया 14 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे, ज्यासाठी त्यांनी प्रसार माध्यमांना निमंत्रण पाठविले आहे. निमंत्रणामध्ये मोठा '5' लोगो वापरला गेला आहे. लोगो वरून हे स्पष्ट आहे की शाओमी आपला रेडमी 5 हा बजेट स्मार्टफोन 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करणार आहे. तसेच या स्मार्टफोन बरोबर रेडमी 5 प्लस देखील प्रदर्शित केला जाऊ शकतो. रेडमी 5 हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम / 64 जीबी स्टोरेज अशा तीन प्रकारात येण्याची शक्यता आहे. हा फोन चीनी बाजारपेठेत  डिसेंबरमध्ये ब्लॅक, गोल्ड, लाईट ब्लू, आणि रोझ गोल्ड अशा चार रंगांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. शाओमी Redmi 5 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज ची किंमत 799 चीनी युआन (सुमारे रु 8,100), 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज ची किंमत 899 चीनी युआन (रुपये 9,100) 4 जीबी रॅम ची किंमत 10,900 चिनी युआन (सुमारे 11,200 रुपये) आहे. शाओमी Redmi 5 प्लस 3 जीबी रॅम / 32 जीब

स्मार्टफोन मधील डिलीट झालेले फोटो मिळवा काही सेकंदात


आपल्या आयुष्यातील अनेक ‘संस्मरणीय क्षण’ आपल्याला कायम लक्षात रहावे यासाठी सध्या स्मार्टफोनच्या साहाय्याने आपण फोटो काढतो. परंतु काही वेळेस आपल्याला नको असलेले फोटो डिलीट करण्याच्या नादात आपण आपले संस्मरणीय फोटो देखील डिलीट करतो. ज्यामुळे आपल्याला फार दु:ख होते. कारण एकदा निघून गेलेला क्षण आपल्या वाट्याला कधीच येणार नाही. पण आजच्या युगात सर्वकाही शक्य आहे. असे बरेच अॅप्स आहेत जे जुने फोटो आपल्याला पुन्हा मिळवून देतात. आज आम्ही तुम्हाला एका अशा अॅपबाबत सांगणार आहोत जे तुम्हाला काही सेकंदात तुमचे डिलीट झालेले फोटो तुमच्या फोनमध्ये परत आणून देईल.

त्या अॅप्लिकेशन नावं डिस्क डिगर फोटो रिकव्हरी (Disk Digger photo recovery) असे आहे. जे स्मार्टफोनमधून डिलीट झालेले फोटो तुम्हाला परत मिळवून देईल. आपण आता संपूर्ण प्रक्रिया समजावून घेऊया.

सर्वात प्रथम हे अॅप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्यावे लागणार आहे.
इन्स्टॉलेशन नंतर, बेसिक फोटो स्कॅनचा पर्याय दिसेल. आपल्याला त्यावर क्लिक करावे लागेल
त्यानंतर प्रक्रिया सुरू होईल आणि आपण हटविलेले फोटो दिसू लागतील.
फोटो रिकव्हर करण्यासाठी तुम्हाला फोनला रुट करण्याची आवश्यकता नाही.
आपण या अॅपवर डिलीट झालेले फोटो तसेच व्हिडिओ देखील मिळवू शकता.
डिलीट झालेले फोटो आपण ड्रापबॉक्स आणि ईमेल द्वारे सुद्धा पाठवू शकता.

हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर बरेच लोकप्रिय झाले आहे. डिफियंट टेक्नॉलॉजीजने हे अॅप तयार केले आहे. गुगल प्ले स्टोअर वर या अॅपला ५ पैकी ४.१ रेटिंग मिळाली आहे. हे अॅप आतापर्यंत ५ कोटी पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शैक्षणिक क्षेत्रातील "महामेरू"

मोबाईल हँग होण्याची कारणे व उपाय.

मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी काय करावे?