शाओमी चा फुल डिस्प्ले बजेट फोन लवकरच भारतात

इमेज
शाओमीचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत येणार आहे. हा 2018 मधील भारतीय बाजारपेठेतील शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल. शाओमी इंडिया 14 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे, ज्यासाठी त्यांनी प्रसार माध्यमांना निमंत्रण पाठविले आहे. निमंत्रणामध्ये मोठा '5' लोगो वापरला गेला आहे. लोगो वरून हे स्पष्ट आहे की शाओमी आपला रेडमी 5 हा बजेट स्मार्टफोन 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करणार आहे. तसेच या स्मार्टफोन बरोबर रेडमी 5 प्लस देखील प्रदर्शित केला जाऊ शकतो. रेडमी 5 हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम / 64 जीबी स्टोरेज अशा तीन प्रकारात येण्याची शक्यता आहे. हा फोन चीनी बाजारपेठेत  डिसेंबरमध्ये ब्लॅक, गोल्ड, लाईट ब्लू, आणि रोझ गोल्ड अशा चार रंगांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. शाओमी Redmi 5 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज ची किंमत 799 चीनी युआन (सुमारे रु 8,100), 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज ची किंमत 899 चीनी युआन (रुपये 9,100) 4 जीबी रॅम ची किंमत 10,900 चिनी युआन (सुमारे 11,200 रुपये) आहे. शाओमी Redmi 5 प्लस 3 जीबी रॅम / 32 जीब

सेल्फी सेल्फी सेल्फी झालं आता पुढं काय ?

काही वर्षापूर्वी जगातील नंबर 1 असलेली स्मार्टफोन उत्पादक कंपनी नोकियाने आपला नवीन स्मार्टफोन नोकिया 7 चिनी बाजारपेठेत दाखल केला आहे. या फोनबद्दल सर्वात आकर्षणाची गोष्ट म्हणजे कंपनीने या स्मार्टफोनमध्ये बोथी हा पर्याय दिलेला आहे. बोथीच्या मदतीने आपण एकाच वेळी समोरील आणि पाठीमागील कॅमेर्‍याने फोटो किंवा व्हिडिओ काढू शकतो. याअगोदर कंपनीने ही सुविधा नोकिया  8 या फोनमध्ये दिली होती. नोकिया 7 हा नोकिया 8 च्या लहान वर्जनची प्रचिती दिसतो.

नोकिया 7 ची वैशिष्ट्ये : -

हा फोन 5.2 इंची पूर्ण एचडी स्क्रीनसह येतो. याला गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण आहे . नोकिया 7 snapdragon 630 ऑक्टा कोर प्रोसेसरसह येतो. हा स्मार्टफोन 4 जीबी आणि 6 जीबी रॅममध्ये उपलब्ध आहे. त्याची इनबिल्ट स्टोरेज 64 जीबी आहे ती 128 जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते. नोकिया 7 हा दोन सिम स्मार्टफोन आहे पण तो एका हायब्रिड सिम स्लॉटसह येतो. नोकिया 7 बॉक्सच्या बाहेर 7.1.1 अँड्रॉइड नुगट सह येतो.

नोकिया 7 मध्ये एक 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आहे, ज्यामध्ये अपर्चर 1.8 आहे. समोरचा कॅमेरा  5 मेगापिक्सेल 2.0 अपर्चरसह येतो. दिलेल्या बोथी वैशिष्ट्यामुळे आपण फोटो आणि व्हिडियो एकाच वेळी पुढच्या आणि मागील कॅमेर्याद्वारे शूट करू शकता. पॉवर बॅकअपसाठी नोकिया 7 मध्ये 3000 mAh बॅटरी आहे. हा फोन फिंगरप्रिंट सेंसरसह येतो.

नोकिया 7 4जीबी मॉडेलची किंमत 25 हजार रुपये तर 6 जीबी मॉडेलची किंमत 27 हजार रुपये आहे. हा मोबाईल भारतामध्ये केंव्हा येणार याबद्दल कंपनीने कोणतीही घोषणा केलेली नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोबाईल हँग होण्याची कारणे व उपाय.

शैक्षणिक क्षेत्रातील "महामेरू"

मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी काय करावे?