शाओमी चा फुल डिस्प्ले बजेट फोन लवकरच भारतात

इमेज
शाओमीचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत येणार आहे. हा 2018 मधील भारतीय बाजारपेठेतील शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल. शाओमी इंडिया 14 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे, ज्यासाठी त्यांनी प्रसार माध्यमांना निमंत्रण पाठविले आहे. निमंत्रणामध्ये मोठा '5' लोगो वापरला गेला आहे. लोगो वरून हे स्पष्ट आहे की शाओमी आपला रेडमी 5 हा बजेट स्मार्टफोन 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करणार आहे. तसेच या स्मार्टफोन बरोबर रेडमी 5 प्लस देखील प्रदर्शित केला जाऊ शकतो. रेडमी 5 हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम / 64 जीबी स्टोरेज अशा तीन प्रकारात येण्याची शक्यता आहे. हा फोन चीनी बाजारपेठेत  डिसेंबरमध्ये ब्लॅक, गोल्ड, लाईट ब्लू, आणि रोझ गोल्ड अशा चार रंगांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. शाओमी Redmi 5 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज ची किंमत 799 चीनी युआन (सुमारे रु 8,100), 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज ची किंमत 899 चीनी युआन (रुपये 9,100) 4 जीबी रॅम ची किंमत 10,900 चिनी युआन (सुमारे 11,200 रुपये) आहे. शाओमी Redmi 5 प्लस 3 जीबी रॅम / 32 जीब

मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी काय करावे?

   

  • मोबाईलचा स्फोट होणे ही आजकाल सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. मोबाईल फोनच्या स्फोटाच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो. परंतु हे खुप भयानक आहे आणि फोनची बॅटरी फुटल्यामुळे तुम्ही गंभीर जखमी होऊ शकता. हे टाळण्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया काही अशा गोष्टी ज्यामुळे असे अपघात टाळता येतील.

फोन माझा एक मित्र
  • आपल्या फोनचे वेगवेगळ्या (अनेक) चार्जरशी संबंध ठेवु नका. थोडक्यात आपल्या मोबाईल सोबत जो चार्जर आला असेल त्याच चार्जरने मोबाईल चार्जिंग करा.
  • आपला फोन सतत (वांरवार) चार्जिंग करु नका.
  • फोन रात्री चार्जिंगला लावून झोपू नये.
  • फोन चार्ज होते वेळी फोनवर बोलणे,गेम खेळणे, इंटरनेटचा वापर करणे टाळावे.
  • फोनवर कोणताही बाह्य दबाव पडणार नाही याची काळजी घ्या.
  • कोणत्याही कारणाने बॅटरी खराब झाल्यास त्याच कंपनीच्या बॅटरीची निवड करा. लोकल बॅटरी घेऊ नका.
  • आपण जास्त दिवसांसाठी बाहेरगावी जाणार असाल तर आपल्या फोनचा चार्जर बरोबर घेऊन जावे.
  • आपला फोन आपल्या हातातून निसटून खाली पडतो. त्यामुळे आपल्या फोनच्या बॅटरी मध्ये लिकेज होण्याची शक्यता असते. यामुळे आपला फोन काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोबाईल हँग होण्याची कारणे व उपाय.

शैक्षणिक क्षेत्रातील "महामेरू"