शाओमी चा फुल डिस्प्ले बजेट फोन लवकरच भारतात

इमेज
शाओमीचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत येणार आहे. हा 2018 मधील भारतीय बाजारपेठेतील शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल. शाओमी इंडिया 14 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे, ज्यासाठी त्यांनी प्रसार माध्यमांना निमंत्रण पाठविले आहे. निमंत्रणामध्ये मोठा '5' लोगो वापरला गेला आहे. लोगो वरून हे स्पष्ट आहे की शाओमी आपला रेडमी 5 हा बजेट स्मार्टफोन 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करणार आहे. तसेच या स्मार्टफोन बरोबर रेडमी 5 प्लस देखील प्रदर्शित केला जाऊ शकतो. रेडमी 5 हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम / 64 जीबी स्टोरेज अशा तीन प्रकारात येण्याची शक्यता आहे. हा फोन चीनी बाजारपेठेत  डिसेंबरमध्ये ब्लॅक, गोल्ड, लाईट ब्लू, आणि रोझ गोल्ड अशा चार रंगांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. शाओमी Redmi 5 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज ची किंमत 799 चीनी युआन (सुमारे रु 8,100), 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज ची किंमत 899 चीनी युआन (रुपये 9,100) 4 जीबी रॅम ची किंमत 10,900 चिनी युआन (सुमारे 11,200 रुपये) आहे. शाओमी Redmi 5 प्लस 3 जीबी रॅम / 32 जीब

मोबाईलवर बोलणारा जगातील पहिला व्यक्ती ?

आजच्या तंत्रज्ञान युगात मोबाईल फोन ही एक सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. आजच्या काळात ज्यांच्याकडे मोबाईल नाही अशी मानसं शोधून काढणे खुप कठीण आहे. सध्या आपण मोबाईल फोन वरून आपल्या मित्र-मैत्रिंनीना, नातेवाईकांना बोलत असतो. पण आपण कधी विचार केला का की जगात सर्वात प्रथम मोबाईल फोन वरून कोण बोलले असेल. चला जाणून घेऊया त्या व्यक्ती विषयी व जगातील पहिल्या हातातील फोन विषयी.

1973 पूर्वी, मोबाईल टेलिफोनी कार आणि इतर वाहनांमधील स्थापित ( बसवलेल्या ) फोनवर मर्यादित होती. मोटोरोला ही हातातील मोबाईल फोन निर्मिती करणारी पहिली कंपनी होती. 3 एप्रिल 1973 रोजी, मोटोरोलाचे संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी मार्टिन कूपर यांनी हातातील उपकरणातून पहिला मोबाइल टेलिफोन कॉल केला. तो कॉल त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी बेल लॅबचे डॉ. जोएल एस. एंगेल यांना केला होता. डॉ. कूपर यांनी वापरलेला प्रोटोटाइप फोन 1.1 किलो (2.42 पौंड) वजनाचा होता. आणि तो  23 सेंमी लांब, 13 सेमी रुंद आणि 4.45 सें.मी. जाड होता. त्या फोनने फक्त 30 मिनिटांचा टॉक टाईम दिला आणि पुन्हा चार्ज करण्यासाठी त्याला 10 तास लागले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शैक्षणिक क्षेत्रातील "महामेरू"

मोबाईल हँग होण्याची कारणे व उपाय.

मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी काय करावे?