शाओमी चा फुल डिस्प्ले बजेट फोन लवकरच भारतात

इमेज
शाओमीचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत येणार आहे. हा 2018 मधील भारतीय बाजारपेठेतील शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल. शाओमी इंडिया 14 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे, ज्यासाठी त्यांनी प्रसार माध्यमांना निमंत्रण पाठविले आहे. निमंत्रणामध्ये मोठा '5' लोगो वापरला गेला आहे. लोगो वरून हे स्पष्ट आहे की शाओमी आपला रेडमी 5 हा बजेट स्मार्टफोन 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करणार आहे. तसेच या स्मार्टफोन बरोबर रेडमी 5 प्लस देखील प्रदर्शित केला जाऊ शकतो. रेडमी 5 हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम / 64 जीबी स्टोरेज अशा तीन प्रकारात येण्याची शक्यता आहे. हा फोन चीनी बाजारपेठेत  डिसेंबरमध्ये ब्लॅक, गोल्ड, लाईट ब्लू, आणि रोझ गोल्ड अशा चार रंगांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. शाओमी Redmi 5 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज ची किंमत 799 चीनी युआन (सुमारे रु 8,100), 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज ची किंमत 899 चीनी युआन (रुपये 9,100) 4 जीबी रॅम ची किंमत 10,900 चिनी युआन (सुमारे 11,200 रुपये) आहे. शाओमी Redmi 5 प्लस 3 जीबी रॅम / 32 जीब

जगावेगळी आॅफर......,..... ऍमेझॉन इंडियाची

जगावेगळी आॅफर .............

        ऍमेझॉन इंडियाचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल्स सुरू होण्यापूर्वीच, प्रत्येक ग्राहकाचे लक्ष ऍमेझॉनच्या ऑफरवर असेल. दरम्यान, ई-कॉमर्स साइटने ग्राहकांच्या सोयीसाठी एक अनोख्या ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत, ग्राहक आत्ताच उत्पादन विकत घेतील, परंतु पुढील वर्षी जानेवारीपासून ते पैसे हप्त्यांमध्ये देतील.

         या प्रकारचे नाव 'आता विकत घ्या, पैसे पुढील वर्षी द्या' ( 'Buy now, pay next year' )ही ऑफर एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डाच्या ग्राहकांसाठी असेल. ग्राहक ऍमेझॉन विक्री दरम्यान खरेदी करण्यास सक्षम असेल, परंतु त्यांना जानेवारी 2018 पासून हप्त्यात किंमत द्यावी लागेल.
         ऍमेझॉन सेल 21 सप्टेंबर 2017 पासून सुरू होईल. परंतु प्राईम मेंबरना या ऑफरचा लाभ सप्टेंबर 20 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून उचलता येईल. तो 21 सप्टेंबरला प्रत्येक ग्राहकाला उपलब्ध असेल.

         ग्राहकांच्या सोयीनुसार ऍमेझॉनची ही ऑफर जोडली जात आहे. यावेळी ग्राहकांच्या सोयीसाठी फोकस हाच उद्देश आहे. कंपनीने 11 बँक आणि बजाज फायनान्स सर्व्हिसेस यांच्याशी भागीदारी केली आहे, जेणेकरून झिरो ईएमआय आणि रोख परत मिळू शकेल. कंपनीने म्हटले आहे की एचडीएफसी डेबिट कार्डाधारकांना खरेदीवर अतिरिक्त 10% सूट देण्यात येईल.

         ऍमेझॉन विक्री अंतर्गत, कंपनी मोबाइल फोनवर 500 हून अधिक ऑफर आणि 40 टक्केपर्यंत सवलत ऑफर करत आहे. सेलच्या चार दिवसांत 40,000 हून अधिक ऑफर उपलब्ध असतील.

         याशिवाय, ऍमेझॉन इंडियाने नुकतेच 'क्रॉस कैटगरी  एक्सचेंज' कार्यक्रम सादर केला. याद्वारे, टेलीव्हिजन, टॅब्लेट किंवा लॅपटॉप खरेदी करताना ग्राहक त्यांचे जुने स्मार्टफोन एक्सचेंज म्हणून देऊ शकतात. ही ऑफर ऍमेझॉन सेलपासून दिवाळीपर्यंत उपलब्ध असेल.

        ऍमेझॉन इंडियाचा हा सेल 21 सप्टेंबर 2017 ते 24 सप्टेंबर 2017 पर्यंत सुरू आहे.

        ऍमेझॉन वरील सर्व आॅफर बद्दल अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच 'फोन माझा' फेसबुक पेजला लाईक करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मोबाईल हँग होण्याची कारणे व उपाय.

शैक्षणिक क्षेत्रातील "महामेरू"

मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी काय करावे?