शाओमी चा फुल डिस्प्ले बजेट फोन लवकरच भारतात

इमेज
शाओमीचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत येणार आहे. हा 2018 मधील भारतीय बाजारपेठेतील शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल. शाओमी इंडिया 14 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे, ज्यासाठी त्यांनी प्रसार माध्यमांना निमंत्रण पाठविले आहे. निमंत्रणामध्ये मोठा '5' लोगो वापरला गेला आहे. लोगो वरून हे स्पष्ट आहे की शाओमी आपला रेडमी 5 हा बजेट स्मार्टफोन 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करणार आहे. तसेच या स्मार्टफोन बरोबर रेडमी 5 प्लस देखील प्रदर्शित केला जाऊ शकतो. रेडमी 5 हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम / 64 जीबी स्टोरेज अशा तीन प्रकारात येण्याची शक्यता आहे. हा फोन चीनी बाजारपेठेत  डिसेंबरमध्ये ब्लॅक, गोल्ड, लाईट ब्लू, आणि रोझ गोल्ड अशा चार रंगांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. शाओमी Redmi 5 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज ची किंमत 799 चीनी युआन (सुमारे रु 8,100), 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज ची किंमत 899 चीनी युआन (रुपये 9,100) 4 जीबी रॅम ची किंमत 10,900 चिनी युआन (सुमारे 11,200 रुपये) आहे. शाओमी Redmi 5 प्लस 3 जीबी रॅम / 32 जीब

मेमरी म्हणजे काय ?



मानवामध्ये लक्षात ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे स्मृती असते त्याचप्रमाणे संगणकाकडे डेटा लक्षात ठेवण्यासाठी मेमरी असते. ही मेमरी C.P.U. चा अविभाज्य भाग असते. याला संगणकाची मुख्य मेमरी, अंतर्गत मेमरी, किंवा प्राथमिक मेमरी म्हटले जाते.

मेमरीचे सर्वात लहान एकक म्हणजे बिट होय.

* बिट मेमरीमध्ये संग्रहित डेटा 0 आणि 1 ला एकत्रितपणे बायनरी अंक म्हणून ओळखला जातो. थोडक्यात त्यास बिट देखील म्हणतात. हे बिट मोबाईल किंवा कॉम्प्यूटर मध्ये स्मृतीद्वारे व्यापलेली जागा मोजण्यासाठी सर्वात लहान एकक आहे.

चला तर पाहुयात ही मेमरी कशा प्रकारे वाढत जाते.

  • 8 बिट               = 1 बाइट ( Byte )
  • 1024 Byte.      = 1 किलोबाइट (1 KB)
  • 1024 KB.         = 1 मेगाबाइट (1 MB)
  • 1024 MB.        = 1 गिगाबाइट (1 GB)
  • 1024 GB.         = 1 टेराबाईट (1 TB)
मेमरी ही आणखीन अशीच पुढे वाढत जाते. आपणास ही माहिती नंतर आवश्यकतेनुसार पुरवण्यात येईल.

आपल्या फोन किंवा संगणकामध्ये दोन प्रकारची मेमरी असते. चला जाणून घेऊया या बाबतीत.


  1. रॅम ( RAM )
  2. रोम ( ROM )


* रॅम (रँडम एक्सेस मेमरी): -

रॅम किंवा रँडम एक्सेस मेमरी फोन किंवा कंप्यूटर्समध्ये टेम्पर्री मेमरी आहे. की-बोर्ड किंवा कोणत्याही अन्य इनपुट साधनाद्वारे इनपुट केलेली माहिती प्रक्रियापूर्वी रॅममध्ये संग्रहित केली जाते आणि नंतर आवश्यकतेनुसार सीपीयूद्वारे तेथून प्राप्त केली जाते. डेटा किंवा प्रोग्राम तात्पुरता रॅममध्ये साठवला जातो. रॅममध्ये अनेक क्षमता किंवा आकार आहेत जसे की 4 एमबी, 8 एमबी, 16 एमबी, 32 एमबी, 64 एमबी, 128 एमबी, 256 एमबी, 512 एमबीए, 1 जीबी, 2 जीबी इ.


* रोम ( रिड ओन्ली मेमरी ): -

रोमचे संपूर्ण नाव रीड ओन्ली मेमरी आहे. ही कायमस्वरूपी मेमरी आहे जी फोन किंवा संगणकाच्या निर्मितीदरम्यान प्रोग्राम संग्रहित करण्यासाठी वापरण्यात येते. स्टोअर प्रोग्राम या संचयामधुन रूपांतरित किंवा नष्ट केले जाऊ शकत नाहीत, ते केवळ वाचले जाऊ शकतात. म्हणूनच या मेमरीला केवळ वाचनीय मेमरी म्हटले जाते. यालाच आपण स्टोअरेज म्हणतो. रॅमप्रमाणेच रोममध्ये देखील अनेक क्षमता आहेत. जसे की 4 एमबी, 8 एमबी, 16 एमबी, 32 एमबी, 64 एमबी, 128 एमबी, 256 एमबी, 512 एमबीए, 1 जीबी, 2 जीबी, 4 जीबी, 8 जीबी, 16 जीबी, 32 जीबी, 64 जीबी, 128 जीबी, 256 जीबी, 512 जीबी, 1 टिबी इ.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शैक्षणिक क्षेत्रातील "महामेरू"

मोबाईल हँग होण्याची कारणे व उपाय.

मोबाईलचा स्फोट टाळण्यासाठी काय करावे?