शाओमी चा फुल डिस्प्ले बजेट फोन लवकरच भारतात
शाओमीचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत येणार आहे. हा 2018 मधील भारतीय बाजारपेठेतील शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल. शाओमी इंडिया 14 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहे, ज्यासाठी त्यांनी प्रसार माध्यमांना निमंत्रण पाठविले आहे. निमंत्रणामध्ये मोठा '5' लोगो वापरला गेला आहे. लोगो वरून हे स्पष्ट आहे की शाओमी आपला रेडमी 5 हा बजेट स्मार्टफोन 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित करणार आहे. तसेच या स्मार्टफोन बरोबर रेडमी 5 प्लस देखील प्रदर्शित केला जाऊ शकतो. रेडमी 5 हा स्मार्टफोन 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम / 64 जीबी स्टोरेज अशा तीन प्रकारात येण्याची शक्यता आहे. हा फोन चीनी बाजारपेठेत डिसेंबरमध्ये ब्लॅक, गोल्ड, लाईट ब्लू, आणि रोझ गोल्ड अशा चार रंगांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. शाओमी Redmi 5 2 जीबी रॅम / 16 जीबी स्टोरेज ची किंमत 799 चीनी युआन (सुमारे रु 8,100), 3 जीबी रॅम / 32 जीबी स्टोरेज ची किंमत 899 चीनी युआन (रुपये 9,100) 4 जीबी रॅम ची किंमत 10,900 चिनी युआन (सुमारे 11,200 रुपये) आहे. शाओमी Redmi 5 प्लस 3 जीबी रॅम / 32 जीब